आर्टिचोक
आर्टिचोक : या नावाने ओळखल्या जात असलेल्या तीन ð ओषधीय वनस्पती आहेत : (१) जेरूसलेम आर्टिचोक (इं. जिरॅसोल) ही सूर्यफुलाच्या वंशातील जाती (हेलिअँथस ट्युबरोजस, कुल-कंपॉझिटी) असून अधिक परिचित आहे; (२) ग्लोब आर्टिचोक ही त्याच कुलातील पण अन्य वंशातील जाती (सायनॅरा स्कोलिमस) आहे; (३) चिनी आर्टिचोक (स्टॅकिस ट्युबरिफेरा) ही लॅबिएटी कुलातील आहे. तिन्ही भाज्या आहेत.